कोरोना आणि आयुर्वेद ( नाडीचिकित्सा आणि आपले आरोग्य )
वैद्य विश्वास घाटगे आयुर्वेदाचार्य (वैद्य विश्वास घाटगे हे नाडीचिकित्सेमधील तज्ज्ञ असून आयुर्विश्व हेल्थकेअरचे संचालक आहेत. नाडीचिकीत्सेद्वारे १०००० पेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार करण्याचा १५ वर्षांचा त्यांना अनुभव आहे.) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सदर लेखाशी संदर्भित कोरोना आणि आयुर्वेद याबद्दल त्यांचे विचार मांडले आहेत. गेले काही महिने करोना अर्थात COVID -19 विषाणु संसर्गाशी आपण सर्वच लढा देत आहोत. संपूर्ण जगभरामध्ये असे विषाणुसंसर्ग आणि रोग प्रतिकार शक्ती याविषयी चर्चा झालेली आढळते, कारण असे विषाणू संसर्ग ज्यांची आंतरिक रोग प्रतिकारशक्ती काही पूर्वीच्या आजाराने कमकुवत आहे किंवा स्वतःहूनच कमकुवत आहेत त्यांच्यामध्ये अधिक गंभीर लक्षणे निर्माण करतात प्रसंगी मृत्यूला कारणीभूत ठरू शकतात. रोग प्रतिकारशक्ती विषयी बोलताना आयुर्वेद आणि आयुर्वेदीय औषधांविषयी बोलणे अगत्याचे ठरते !!!! म्हणूनच मी येथे आयुर्वेद अर्थात आयुष्याचा वेद किंवा शास्त्र अर्थात आयुर्वेदात शास्त्रांचा उल्लेख करेन कारण आयुर्वेदामध्ये निरोगी मनुष्य म्हणजे काय? निरोगी मनुष्याचे दैनंदिन जीवनातील आचरण कसे असावे? दिन