नाडीचिकित्सा आणि आपले आरोग्य
नमस्कार मित्रांनो, वैद्यक शास्त्राचे विविध पैलू आणि आरोग्य यांचा विचार करताना आयुर्वेदाचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. हजारो वर्षे संशोधन आणि उपाय केलेले हे शास्त्र विविध असाध्य रोगांवरील उपचारांसाठी उपयुक्त ठरते. आयुर्वेदाच्या वेगवेगळ्या पद्धतींपैकी एक म्हणजे नाडी परिक्षणावर आधारित चिकित्सा व त्याआधारे केलेली उपचार पद्धती म्हणजेच नाडीचिकित्सा. नाडीचिकित्सेविषयी आपण जाणून घेऊयात. नाडीचिकित्सेमध्ये वैद्य रुग्णाच्या डाव्या हाताची किंवा उजव्या हाताची नाडी पाहून त्याला होणाऱ्या आजारांविषयी तसेच त्यामागील कारणांविषयी जाणून घेतो. या नाडीपरीक्षेवरच आधारित चिकित्सा आपल्या वेगवेगळ्या आरोग्याविषयक समस्या आणि आजारांचे निराकरण कसे करते ते आज आपण जाणून घेऊ. खरं तर नाडीपरीक्षा या निदान पद्धतीचा उल्लेख सुमारे ५००० वर्षांपूर्वी आयुर्वेद या भारतीय वैद्यकशास्त्रामध्ये आढळतो. काही ग्रंथानुसार रावणकृतं नाडीपरीक्षा शास्त्र तसेच कणाद ऋषींनी लिहिलेला नाडीशास्त्र विषयक ग्रंथामध्ये नाडीपरीक्षेचा उल्लेख आढळतो. आयुर्वेद या शब्दाचा अर्थच मुळात सांगतो आयुष्यात वेद अर्थात आयुर्वेद ज्याला आपण Science of Life