नाडीचिकित्सा आणि आपले आरोग्य
नमस्कार मित्रांनो,
वैद्यक शास्त्राचे विविध पैलू आणि आरोग्य यांचा विचार करताना आयुर्वेदाचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. हजारो वर्षे संशोधन आणि उपाय केलेले हे शास्त्र विविध असाध्य रोगांवरील उपचारांसाठी उपयुक्त ठरते. आयुर्वेदाच्या वेगवेगळ्या पद्धतींपैकी एक म्हणजे नाडी परिक्षणावर आधारित चिकित्सा व त्याआधारे केलेली उपचार पद्धती म्हणजेच नाडीचिकित्सा. नाडीचिकित्सेविषयी आपण जाणून घेऊयात.
नाडीचिकित्सेमध्ये वैद्य रुग्णाच्या डाव्या हाताची किंवा उजव्या हाताची नाडी पाहून त्याला होणाऱ्या आजारांविषयी तसेच त्यामागील कारणांविषयी जाणून घेतो. या नाडीपरीक्षेवरच आधारित चिकित्सा आपल्या वेगवेगळ्या आरोग्याविषयक समस्या आणि आजारांचे निराकरण कसे करते ते आज आपण जाणून घेऊ.
खरं तर नाडीपरीक्षा या निदान पद्धतीचा उल्लेख सुमारे ५००० वर्षांपूर्वी आयुर्वेद या भारतीय वैद्यकशास्त्रामध्ये आढळतो. काही ग्रंथानुसार रावणकृतं नाडीपरीक्षा शास्त्र तसेच कणाद ऋषींनी लिहिलेला नाडीशास्त्र विषयक ग्रंथामध्ये नाडीपरीक्षेचा उल्लेख आढळतो.
आयुर्वेद या शब्दाचा अर्थच मुळात सांगतो आयुष्यात वेद अर्थात आयुर्वेद ज्याला आपण Science of Life म्हणू शकतो. आयुर्वेद या वेदामध्ये जीवन म्हणजे काय? जीवन कसे असावे ? आयुमर्यादा किती आहे ? आपल्या जीवनामध्ये हीतकर काय आहे आणि अहीतकर काय आहे याचा उल्लेख आढळतो याच जोडीला अहीतकर आहार - विहार सेवनाने आणि आचरणाने कोणते व्याधी आणि आरोग्य विषयक समस्या उत्पन्न होतात यांचेसविस्तर वर्णन आढळते. व्याधी आणि त्यांची लक्षणेवर्णन करताना आजाराचेनिदान करण्यासाठी आयुर्वेदानेस्वतःची निदान पद्धती अर्थात Dianostic Procedure वर्णन केली आहे. ज्याला अष्टविद्या परीक्षा म्हणतात.
आयुर्वेदातील अष्टविद्या परीक्षा
नाडी - Pulse मूत्र - Urine
मल - Stool जिव्हा - Tongue
शब्द - Sound स्पर्श - Touch
दृक आकृती
या पैकी नाडीपरीक्षेचे विशेष महत्व आहे. नाडीपरीक्षेमध्ये पुरुषांच्या उजव्या हाताची आणि स्त्रियांच्या डाव्या हाताची नाडी / Redial Artery वरील स्पंदनेहाताची तर्जनी, मध्यमा आणि अनामिका या बोटांच्या साहाय्याने स्पर्शकरून जाणून घेतली जातात. या स्पंदनाद्वारे प्रामुख्याने शरीरातील त्रिदोष (वात, पित्त, कफ) सप्तधातूयांच्या स्थितीचे आकलन करून घेतले जाते.
आयुर्वेदीय शास्त्रानुसार कोणत्याही व्याधी निर्मिती होताना या त्रिदोषांममध्ये अवलोकन घडतो आणि धांतूंमध्ये हे दोष संचित होऊन व्याधी निर्मिती होते. नेमके याचे निदान नाडीपरीक्षेद्वारे करता येते, शरीरातील दोषस्थिती समजून घेता येते. आज वैद्यकीय क्षेत्रामध्येबरेच आजार आव्हानात्मक ठरतात ज्यांमध्ये विविध संधिविकार जसे की गुडघेदुखी, कंबरदुखी, मणक्यांचे आजार, संधिवात, आमवात, सायटिका, AVN (Avascular Necrosis) चिकिनगुनिया तसेच सोरायसिस, एक्सिमा, पांढरेडाग, विविध प्रकारच्या त्वचेशी संबंधित ॲलर्जी यासाठी कायमस्वरूपी औषाधोपचारांचा अभाव आढळतो, कारण या आजारांच्या बाबतीत केवळ लक्षणांनुसार औषधे दिली जातात या लक्षणांमागील मूळ कारण समजून घेतलेजात नाही. यामुळेच जोवर औषधे सुरु आहेत तोपर्यंतच बरे वाटते औषधांमध्ये खंड पडला की आजार पूर्वस्थितीत उत्पन्न होतो.
उलटपक्षी नाडीचिकित्सेमध्ये नाडीपरीक्षेनुसार या रुग्णांच्या शरीरातील क्रियात्मक, शारीरिक, मानसिक, विकारांचा सखोल अभ्यास करून त्या आजारामागील मूळ कारण अर्थात शरीरातील दोषांचे आकलन करून चिकित्सा केल्याने आजाराचा समूळ नाश करण्यासाठी नाडीचिकित्सा उपयोगी ठरते. याच्या जोडीला सततची डोकेदुखी, Migraine, गॅसेस, अपचन, IBS, Acidity, यांसारखे त्रासदायक आजार तसेच सर्दी, खोकला, दमा, Allergy, श्वासनाच्या तक्रारी यामध्येनाडीचिकित्सा प्रभावी ठरू शकते, कारण या आजारांमागील मूळ कारण, दोषस्थिती, रुग्णाच्या शरीरातील शाररिक बदल, मानसिक बदल यांचा संपूर्ण अभ्यास नाडीचिकित्सेद्वारे होतो.
वैद्य विश्वास घाटगे आयुर्वेदाचार्य (वैद्य विश्वास घाटगे हे नाडीचिकित्सेमधील तज्ज्ञ असून आयुर्विश्व हेल्थकेअरचे संचालक आहेत. नाडीचिकीत्सेद्वारे १०००० पेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार करण्याचा १५ वर्षांचा त्यांना अनुभव आहे.)
Comments
Post a Comment