कोरोना आणि आयुर्वेद ( नाडीचिकित्सा आणि आपले आरोग्य )
वैद्य विश्वास घाटगे आयुर्वेदाचार्य (वैद्य विश्वास घाटगे हे नाडीचिकित्सेमधील तज्ज्ञ असून आयुर्विश्व हेल्थकेअरचे संचालक आहेत. नाडीचिकीत्सेद्वारे १०००० पेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार करण्याचा १५ वर्षांचा त्यांना अनुभव आहे.) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सदर लेखाशी संदर्भित कोरोना आणि आयुर्वेद याबद्दल त्यांचे विचार मांडले आहेत.
गेले काही महिने करोना अर्थात COVID -19 विषाणु संसर्गाशी आपण सर्वच लढा देत आहोत. संपूर्ण जगभरामध्ये असे विषाणुसंसर्ग आणि रोग प्रतिकार शक्ती याविषयी चर्चा झालेली आढळते, कारण असे विषाणू संसर्ग ज्यांची आंतरिक रोग प्रतिकारशक्ती काही पूर्वीच्या आजाराने कमकुवत आहे किंवा स्वतःहूनच कमकुवत आहेत त्यांच्यामध्ये अधिक गंभीर लक्षणे निर्माण करतात प्रसंगी मृत्यूला कारणीभूत ठरू शकतात.
रोग प्रतिकारशक्ती विषयी बोलताना आयुर्वेद आणि आयुर्वेदीय औषधांविषयी बोलणे अगत्याचे ठरते !!!!
म्हणूनच मी येथे आयुर्वेद अर्थात आयुष्याचा वेद किंवा शास्त्र अर्थात आयुर्वेदात शास्त्रांचा उल्लेख करेन कारण आयुर्वेदामध्ये निरोगी मनुष्य म्हणजे काय? निरोगी मनुष्याचे दैनंदिन जीवनातील आचरण कसे असावे? दिनचर्या तसेच भारतातील ऋतुमानानुसार आचरणात करायचे बदल म्हणजेच ऋतुचर्या या विषयी सखोल माहिती दिलेली आहे. सहाजिकच बदलत्या काळानुसार आणि आधुनिकतेकडे जाताना ह्या दिनचर्या आणि ऋतुचर्या यांचा विसर पडला आहे. आपली रोगप्रतिकारशक्ती टिकवण्यासाठी या शास्त्र पूर्ण आचरणाचा अवलंबन करणे गरजेचे ठरेल.
रोग प्रतिकारशक्ती संदर्भात मत व्यक्त करताना मला वाटते की ज्या व्यक्तीचे आरोग्य जितके निरोगी तितकेच त्याचे व्याधीक्षमत्व उत्तम असते या म्हणण्याला आधार म्हणून खालील श्लोकाचा विचार महत्त्वाचा ठरतो.
समदोष: समाग्नीस समाधातुमलक्रीय:।
प्रसन्नात्मेद्रियमना: स्वस्थ इत्यभिधीयते ।।
ज्या व्यक्तीचे दोष वात, पित्त, कफ, अग्नि (जठराग्नी ) रसादि सप्तधातू सम अवस्थेमध्ये तसेच स्थिर आहेत मल, मूत्रादी क्रिया व्यवस्थित होत आहेत शरीरामधील सर्व क्रिया समान आहेत तसेच ज्या मनुष्याचे मन इंद्रिय आणि आत्मा प्रसन्न आहे त्याला स्वस्थ मनुष्य म्हणावे.
गेली पंधरा वर्षे नाडी चिकित्सेच्या माध्यमातून रुग्णांच्या आरोग्य विषयक समस्यांवर उपाय करताना हाच विचार आयुर्विश्वा हेल्थकेअर आम्ही करतो. मनुष्याच्या शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या दोषांमधील असमतोल आणि धातूंमधील बिघाड कोणत्या न कोणत्या व्याधीची निर्मिती करत असते आणि नेमके हेच दोष धातू व मल यांमधील बिघाड नाडी परिक्षणाने समजुन घेऊन चिकित्सा केली जाते. त्याने व्याधी बारी होण्यासाठी मदत होतेच, परंतु हे करत असताना त्यांच्या दोष धातु मधील बिघाड दूर झाल्याने या रुग्णांमध्ये व्याधीक्षमत्व रोग प्रतिकारशक्ती वाढतांना दिसते. नाडी परीक्षणाद्वारे शरीरातील मुळ बिघाडांचे आकलन होते आणि ते दूर झाल्याने शरीरातील विजातीय घटक कमी झाल्याने त्यांचे अशा विषाणु संसर्गाशी लढा देण्याची ताकद वाढताना आढळून आली.
कोरोनाच्या या काळामध्ये आयुर्विश्व हेल्थकेअर मध्ये चिकित्सा घेत असलेल्या अनेक रुग्णांचे अनुभव होते की सामाजिक अंतर, वैयक्तिक काळजी घेतल्याने त्यांना विषाणु संसर्ग झाला नाही. काही रुग्णांच्या बाबतीत इतर कुटुंब सदस्यांना विषाणू संसर्ग झाला मात्र आयुर्विश्व हेल्थकेअर मधील या रुग्णांमध्ये संसर्ग आढळला नाही तर काही व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला मात्र कोणातही गंभीर लक्षणे निर्माण झाली नाहीत. एरवी वारंवार ऋतू बदलाने होणारा त्रास काहींना कमी झालेला आढळला. तसेच दैनंदिन जीवनातील आंतरिक ऊर्जेचा स्तर वाढलेला आढळून आला. आयुर्वेदातील कडुलिंब, अश्वगंधा, आवळा, गुडूची, तुळस, नागरमोळा, सुंठ यांचा आपल्या प्रकृतीनुरूप वैद्यांच्या सल्ल्याने वापर केला तर निश्चित आपली रोगप्रतिकारशक्ती सुधारेल आणि टिकेल.
नाडी चिकित्सा केवळ व्याधींना, आरोग्य समस्यांना दूर करते एवढेच नाही तर आपल्या आरोग्याचा स्तर सुधारून रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहते जी आपणास भविष्यातील अशा जागतिक महामारी समोर उभे राहण्यासाठी बळ देईल.
अधिक माहितीसाठी आमच्या कोरोना आणि आयुर्वेद या youtube video वर क्लिक करा - https://bit.ly/3761ylB
Article Courtsey :- Loksatta
https://epaper.loksatta.com/c/58365063
Comments
Post a Comment