Posts

Showing posts with the label AyurvedicDoctorinPune

कोरोना आणि आयुर्वेद ( नाडीचिकित्सा आणि आपले आरोग्य )

Image
 वैद्य विश्वास घाटगे आयुर्वेदाचार्य (वैद्य विश्वास घाटगे हे नाडीचिकित्सेमधील तज्ज्ञ असून आयुर्विश्व हेल्थकेअरचे संचालक आहेत. नाडीचिकीत्सेद्वारे १०००० पेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार करण्याचा १५ वर्षांचा त्यांना अनुभव आहे.) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सदर लेखाशी संदर्भित कोरोना आणि आयुर्वेद याबद्दल त्यांचे विचार मांडले आहेत.  गेले काही महिने करोना अर्थात COVID -19 विषाणु संसर्गाशी आपण सर्वच लढा देत आहोत. संपूर्ण जगभरामध्ये असे विषाणुसंसर्ग आणि रोग प्रतिकार शक्ती याविषयी चर्चा झालेली आढळते, कारण असे विषाणू संसर्ग ज्यांची आंतरिक रोग प्रतिकारशक्‍ती काही पूर्वीच्या आजाराने कमकुवत आहे किंवा स्वतःहूनच कमकुवत आहेत त्यांच्यामध्ये अधिक गंभीर लक्षणे निर्माण करतात प्रसंगी मृत्यूला कारणीभूत ठरू शकतात. रोग प्रतिकारशक्ती विषयी बोलताना आयुर्वेद आणि आयुर्वेदीय औषधांविषयी बोलणे अगत्याचे ठरते !!!! म्हणूनच मी येथे आयुर्वेद अर्थात आयुष्याचा वेद किंवा शास्त्र अर्थात आयुर्वेदात शास्त्रांचा उल्लेख करेन कारण आयुर्वेदामध्ये निरोगी मनुष्य म्हणजे काय? निरोगी मनुष्याचे दैनंदिन जीवनातील आचरण ...

नाडीचिकित्सा आणि आपले आरोग्य

Image
 नमस्कार मित्रांनो,  वैद्यक शास्त्राचे विविध पैलू आणि आरोग्य यांचा विचार करताना आयुर्वेदाचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. हजारो वर्षे संशोधन आणि उपाय केलेले हे शास्त्र विविध असाध्य रोगांवरील उपचारांसाठी उपयुक्त ठरते. आयुर्वेदाच्या वेगवेगळ्या पद्धतींपैकी एक म्हणजे नाडी परिक्षणावर आधारित चिकित्सा व त्याआधारे केलेली उपचार पद्धती म्हणजेच नाडीचिकित्सा. नाडीचिकित्सेविषयी आपण जाणून घेऊयात.  नाडीचिकित्सेमध्ये वैद्य रुग्णाच्या डाव्या हाताची किंवा उजव्या हाताची नाडी पाहून त्याला होणाऱ्या आजारांविषयी तसेच त्यामागील कारणांविषयी जाणून घेतो. या नाडीपरीक्षेवरच आधारित चिकित्सा आपल्या वेगवेगळ्या आरोग्याविषयक समस्या आणि आजारांचे निराकरण कसे करते ते आज आपण जाणून घेऊ.  खरं तर नाडीपरीक्षा या निदान पद्धतीचा उल्लेख सुमारे ५००० वर्षांपूर्वी आयुर्वेद या भारतीय वैद्यकशास्त्रामध्ये आढळतो. काही ग्रंथानुसार रावणकृतं नाडीपरीक्षा शास्त्र तसेच कणाद ऋषींनी लिहिलेला नाडीशास्त्र विषयक ग्रंथामध्ये नाडीपरीक्षेचा उल्लेख आढळतो.  आयुर्वेद या शब्दाचा अर्थच मुळात सांगतो आयुष्यात वेद अर्थात आयुर्वेद ज्य...